सोने यंदा भाववाढीचा नवीन उच्चांक गाठणार ! : जळगावातील दर पाहिले का ?


Gold will reach a new high in price this year!: Have you seen the prices in Jalgaon? जळगाव (22 जानेवारी 2025) : काही दिवसांपासून सोने दरात होत असलेली वाढ खरंच नवीन उच्चांक गाठणार का? अशी चिंता आता ग्राहकांना सतावत आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याला झळाळी पाहायला मिळाली असून तज्ज्ञांनी सोन्याचा दर 90 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

सोमवारी सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली. यानंतर मंगळवारी देखील सोन्याचे भाव वाढले होते तर आज बुधवारी म्हणजेच सलग तिसर्‍या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढत असल्याचं दिसून आले त्यामुळे सोनं खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.



डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. बुधवारी म्हणजेच आज 22 जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 22 कॅरेट सोन्याचा दर 75,400 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 82,250 रुपये इतका आहे. दरम्यान चांदी दरातदेखील 1000 ते 1100 रुपयापर्यंतची वाढ झाली असून यामुळे चांदीचा दर 94 हजार रुपयापर्यंत पोहोचला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !