अज्ञात वाहनाच्या धडकेने चाळीसगावातील काका-पुतण्याचा मृत्यू
Uncle and nephew from Chalisgaon died after being hit by an unknown vehicle पाचोरा (22 जानेवारी 2025) : चाळीसगावाती चंडिकावाडी भागातील काका-पुतण्याा पाचोरा येथे अपघाती मृत्यू झाला. निर्मल सीडस् समोरील रस्त्यावर घडलेल्या अपघातप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर मंगतू राठोड (36) आणि संकेत भरत राठोड (18, दोन्ही राहणार चंडिकावाडी, ता.चाळीसगाव) अशी मयत काका-पुतण्यांची नावे आहेत.
काय घडले नेमके
ज्ञानेश्वर राठोड हे आपल्या पुतण्या संकेत भरत राठोड याच्या सोबत जळगावहून चाळीसगाव येथे जाण्यासाठी सोमवार, 20 जानेवारी रोजी पहाटे 4.30 वाजता दुचाकीने निघाले होते. पाचोरा शहरातील निर्मल सीडस् कंपनीच्या समोरील रस्त्यावरून जात असतांना भडगावकडून येणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघात ज्ञानेश्वर राठोड आणि पुतण्या संकेत राठोड हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.


ही घटना घडल्यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहे.