जळगावात घरासमोरुन चोरट्यांनी कार लांबवली


जळगाव (23 जानेवारी 2025) : घरासमोर पार्किंग केलेली मारोती अल्टो कार चोरट्यांनी पळवून लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील प्रतापनगर परिसरात उघडकीस आली.

काय घडले जळगावात
विपुलकुमार पोपटलाल शाह हे (58, रा.प्रतापनगर, स्वामी समर्थ सेवा केंद्राजवळ) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते बांधकाम व्यावसायीक आहेत. त्यांच्या वापरातील कारने (एम.एच.19 एई 5710) ने शनिवारी संध्याकाळी ते घरी आले. घरासमोर कार पार्किंग केली. रात्री चोरट्यांनी लक्ष्य करीत ही कार चोरुन नेली. रविवारी सकाळी शाह हे घराबाहेर पडले असता त्यांना कार दिसली नाही. परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे या करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !