भुसावळात 60 किलो सुतळीच्या वापरातून बनवले पर्यावरणपूरक बाप्पा


भुसावळ (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : भुसावळ शहरातील फालक नगरातील गणेश मंडळाने यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली. मंडळाचे यंदाचे आठवे वर्ष असून यंदा मंडळाचे अध्यक्ष तथा मूर्तीकार उत्तम भोजीया यांच्या संकल्पनेतून मंडळाने 60 किलो सुतळीचा वापर करुन सात फुट उंचीची मुर्ती साकारली.

शहरातील फालक नगरातील फालक नगर गणेश मंडळाने यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंडळाचे अध्यक्ष उत्तम भोजीया यांनी यंदा तागापासून तयार होणार्‍या सुतळीचा वापर करुन गणेशमूर्ती साकारण्याचे नियोजन केले. मंडळाचे उपाध्यक्ष निखील गिरासे, कोषाध्यक्ष संग्राम सपकाळे, अनिल भोजिया, जितेश बुटीया आदींसह सर्व पदाधिकार्‍यांनी सलग आठवडाभर रात्रंदिवस श्रमदान करुन 60 किलो सुतळीचा वापर करुन गणेश मूर्ती साकारत या मूर्तीची प्रतिष्ठा केली आहे.

मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचेही काम केले जाणार आहे. मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरण जागृती, महिला सशक्तीकरण आदी उपक्रम राबवणार आहे.

पर्यावरणाचा जागर करणार उत्सव हवा
गणेशोत्सव हा पर्यावरणाचा जागर करणारा उत्सव व्हायला हवा. बाप्पाची सेवा करून पर्यावरणाची जागृतता सर्वसामान्यांमध्ये रुजवली गेली पाहिजे. याच संकल्पनेतून आम्ही यंदा सुतळीचा वापर करुन गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. भाविकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत असल्याचे मंडहाचे अध्यक्ष उत्तम भोजीया म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !