दोषींवर कारवाईच्या आश्वासनानंतर केदार सानप यांचे उपोषण मागे
भुसावळ (28 जानेवारी 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथील गट 167 पैकी 51, 36, 27 या मधील वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करतांना पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचार्यांनी मिळून शासनाची फसवणूक केली होती. याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी कारवाईबाबत अपर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने रविवार, 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. प्रशासनाने उपोषणाची दखल घेत दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दोषींवर होणार कारवाई
उपोषणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून अर्जदारास कळवण्याचे कळवले आहे. उपोषण मागे घेण्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची समजूत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने गृह शाखेने काढली व लेखी आश्वासनानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी उपोषण मागे घेतले.






