गतवर्षाच्या तुलनेत यंदा गुन्हेगारीत घट : जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी


जळगाव (30 जानेवारी 2025) : गेल्या वर्षाच्या तुलनेत नवीन वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग तसेच घरफोडी अशा विविध मुख्य गुन्ह्यात घट झाली आहे. वर्षभरात शंभरहून अधिक गावठी कट्टे जप्त केले असून गुन्हेगारी नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर गुन्ह्ेगारांची एकाच छताखाली नोंद ठेवण्यात येणार आहे. 15 दिवसात सर्व नोंदी अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळवार, 28 रोजी पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड उपस्थित होते.

खुनाचे सर्व गुन्हे आले उघडकीस
सन 2023 या गतवर्षी जिल्ह्यात खुनाचे 66 गुन्हे दाखल झाले पैकी 64 उघडकीस आले. तर 2024 या वर्षात 65 खुनाचे दाखल झाले. हे सर्व गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. शिवाय या गुन्ह्यात एकने घट झाली. खुनाचा प्रयत्नाचे गेल्या वर्षी 118 गुन्हे दाखल झाले आणि हे सर्व गुन्हे उघडकीस आले. 2024 मध्ये 115 गुन्हे दाखल झाले. हेही सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. याशिवाय गेल्यावर्षाच्या तुलनेत तीनने घट झाली, असे पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी सांगितले.


जबरीचोरी आली नियंत्रणात
2023 या वर्षी जबरी चोरीचे एकुण 146 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 118 उघडकीस आले. राहिलेले 28 गुन्हे उघड आणण्याकामी तपास सुरू आहे. तर 2024 मध्ये जबरी चोरीचे 103 गुन्हे दाखल होऊन 78 उघडकीस आणण्यात यश मिळाले. 25 गुन्ह्े उघडकीस आणण्याकामी तपास सुरू आहे.या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 43 ने घट झाली. चैन स्नॅचिंगचे 2023 मध्ये 31 गुन्हे दाखल होऊन 20 गुन्हे उघडकीस आले. तर 11 नाउघड गुन्ह्यांचा शोध घेतला जात आहे. 2024 मध्ये चैन स्नॅचिंगचे 28 गुन्हे दाखल होऊन 11 उघडकीस आले. 17 गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यातही गेल्या वर्षाच्या तुलनेत तीनने घट झाल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी सांगितले.

घरफोडीतही घट
2023 मध्ये घरफोडीचे 399 दाखल गुन्ह्यापैकी 135 गुन्हे उघडकीस आणले. तर 264 गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. 2024 या वर्षभरात घरफोडीचे 366 गुन्ह्यात 126 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. 240 गुन्ह्यांचा शोध सुरू आहे. घरफोडीत 33 ने घट झाली. 2023 मध्ये एकुण 2,053 गुन्हे दाखल झाले. पैकी 743 गुन्हे उघडकीस आले. तर 1,310 गुन्हे उघडकीस आणण्याकामी तपास सुरू आहे. 2024 मध्ये चोरीचे 1,741 दाखल पैकी 596 गुन्हे उघडकीस आली. उर्वरित 1,145 गुन्ह्यांचा उघड कामी शोध सुरू आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

दुचाकी चोरी 800 पार
गेल्यावर्षी 2023 मध्ये दुचाकी चोरीचे 891 दाखल गुन्ह्यात 239 गुन्हे उघडकीस आले. 652 गुन्हे उघडकीस आणण्याचा शोध सुरु आहे. 2024 मध्ये दुचाकी चोरीचे दाखल 852 गुन्ह्यात 223 गुन्हे उघडकीस आणले. नाउघड 629 गुन्ह्यांचा शोध सुरू आहे. तीन व चार चाकी वाहने चोरीचे 2023 मध्ये दाखल 67 पैकी 32 गुन्हे उघडकीस आणले. 35 नाउघड गुन्ह्याचा शोध सुरू आहे. 2024 मध्ये 49 गुन्हे दाखल होऊन 20 गुन्हे उघडकीस आणले. 29 गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी दिली.

दंगे गुन्हे नियंत्रणात
दंगे, बेकायदेशीर जमाव प्रकरणी 2023 मध्ये 413 गुन्हे दाखल झाले. 2024 मध्ये 351 गुन्हे दाखल आहेत. तुलनात्मक या गुन्ह्यात 2024 मध्ये 62 ने घट झाली. 2024 मध्ये एमपीडीएचे 46 पैकी 45 प्रस्ताव मंजुर झाले. 2023 मध्ये 80 तर सन 2024 मध्ये 122 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई गेल्या वर्षाच्या तुलनेत 42 ने अधिक आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !