अत्याचारातून परप्रांतीय 14 वर्षीय मुलीने दिला बाळास जन्म : तरुणाविरोधात गुन्हा


जळगाव (1 फेब्रुवारी 2025) : भादलीत आलेल्या परप्रांतीय 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षापासून तरुण अत्याचार करीत राहिल्याने पीडीता गर्भवती राहिली व तिने नुकताच बाळास जन्म दिला. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण
जळगाव तालुक्यातील भादली गावात मध्यप्रदेशातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या पालकांसह गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणारा संशयित आरोपी चमासिंग बिलाला (22) याने अल्पवयीन मुलीला गेल्या दोन वर्षांपासून तिच्या अत्याचार केला.



या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी चमासिंग बिलाला याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !