जळगावात दुचाकी चोरट्यांचा उच्छाद : कारमधून येताच लांबवली दुचाकी


Bike thieves on the prowl in Jalgaon: Bike snatched as soon as it came from a car जळगाव (2 फेब्रुवारी 2025) : दुचाकी चोरीत माहिर चोरट्यांनी जळगावात उच्छांद मांडला आहे. शहरात दुचाकी चोरण्यासाठी चोरटे चक्क कार घेऊन येत दुचाकी लांबवत ओहत. दुचाकीजवळ कारमधुन चोरटा उतरला आणि बुलेट घेऊन पसार झाला. चोरीची ही भन्नाट घटना मोहाडी रोडवरील नेहरुनगर परिसरात शुक्रवार, 31 रोजी मध्यरात्रीनंतर घडली. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

काय घडले जळगावात
भरत वासुदेव बेंडाळे (53, रा.प्लॉट नं.51, शोभा अपार्टमेंट,नेहरुनगर) याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कन्स्ट्रक्शन मटेरिअल पुरविण्याचा व्यवसाय करतात. शुक्रवारी ते त्यांच्या मित्राकडील हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. रात्री ते घरी आले तेव्हा घराजवळ त्यांच्या मालकीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एम.एच.19 डी.आर.71111) ही लॉक करुन लावल्याची खात्री करुन ते घरात निघुन गेले. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ते मॉर्नींग वॉकसाठी अपार्टमेंटच्या खाली आले असता त्यांना त्यांची बुलेट दिसली नाही. परिसरात त्यांनी दुचाकीचा शोध घेतला मात्र बुलेटचा तपास लागला नाही. सुमारे 60 हजार किमतीची बुलेट चोरुन नेल्याची खात्री त्यांची झाली. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास किशोर पाटील हे करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !