गाडीचा हप्ता चुकताच कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करीत मागितली खंडणी : बँक अधिकार्‍यांविरोधात गुन्हा


Kidnapped borrower’s son for ransom after car installment was not paid : Case filed against bank officials सोलापूर (3 फेब्रुवारी 2025) : सोलापूरात धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेचा कर्जाचा हप्ता चुकल्यानंतर कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करण्यात आले व खंडणी मागितल्याचा प्रकार समोर घडताच बँकेच्या तिघांविरोात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापुरातील जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

काय घडले सोलापूरात
सोलापुरातील एका व्यक्तीने कार खरेदी करण्यासाठी खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही कारणास्तव कर्जदाराला कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाही. हप्ते वेळेवर न भरल्यामुळे संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले. सोलापुरात एका खाजगी बँकेच्या वसुली कर्मचार्‍यांची ही मुजोरी दिसून आली. या कर्मचार्‍यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्याला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते.



मुलाच्या सुटकेसाठी खंडणीही मागितली
कर्ज वसुलीसाठी अपहरण करणार्‍या शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या वसुली कर्मचार्‍यांविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केलेच, मात्र त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याचे समोर आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !