अमळनेरात खळबळ : स्थानबद्धतेच्या कारवाईतून सुटलेल्या आरोपीवर प्राणघातक हल्ला


Amalnera stir: Fatal attack on accused who escaped from detention अमळनेर (4 फेब्रुवारी 2025) : एमपीडीएतून अलीकडेच सुटून आलेल्या संशयीतावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. विशाल दशरथ चौधरी असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेने अमळनेर शहरात खळबळ उडाली असून हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काय घडले अमळनेरात
विशाल चौधरी हा 1 रोजी एमपीडीएतून सुटून आला असून त्याच्यावर दुसर्‍यांदा एमपीडीए कारवाई झाली होती. 3 रोजी तो बाजार समितीच्या आवारात कामासाठी आला असता त्याच्यावर सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात विशाल चौधरी याच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर तो घटनास्थळी पडला होता.



त्याला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी दाखल केले. तेथून त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. यानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. जखमीच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !