रामानंद पोलिसांची मोठी कामगिरी : आठ घरफोड्यांची उकल, कुविख्यात घरफोड्यांची टोळी जाळ्यात


Ramanand Police’s big achievement : Eight burglaries solved, notorious burglar gang caught जळगाव (प्रतिनिधी) : रामानंद नगर पोलिसांनी कुविख्यात घरफोड्यांच्या पाच जणांच्या टोळीला अटक करीत आठ घरफोड्यांची उकल केली. आरोपींकडून 10 तोळे सोने, 650 ग्रॅम चांदी आणि एलईडी टीव्ही असा एकूण आठ लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन चोरटे हे पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी दिली.

गोपनीय माहितीवरून अटक
संशयित सागर शिवराम डोईफोडे आणि त्याचे साथीदार हे महाबळ परिसरात झालेल्या घरफोड्यांमध्ये सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर रामानंद पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान त्याने 6 घरफोड्यांची कबुली दिली. सागर डोईफोडे आणि त्याच्या साथीदारांनी रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करण्याची रणनीती अवलंबली होती. खिडक्या तोडून घरात प्रवेश करत आणि मौल्यवान वस्तू लंपास करत असत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या वस्तूंपैकी 10 तोळे सोने आणि 650 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे.



या संशयीतांना अटक
सागर डोईफोडेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नितेश मिलिंद जाधव, दीपक विनोद आढाळे, रवी भागवत सोनवणे आणि अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे यांना अटक केली. या संशयित आरोपींनी दोन घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून एलईडी टीव्ही आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांच्या पथकाचेी कारवाई
ही कारवाई रामानंद पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय सपकाळे, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, इरफान मलिक, पोलीस नाईक हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, विनोद सूर्यवंशी, पोलीस शिपाई रवींद्र चौधरी, उमेश पवार यांनी केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !