जळगावात दालमिलमध्ये धाडसी चोरी


जळगाव (6 फेबु्रवारी 2025) : दालमिलमध्ये एन्ट्री करत चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचे लॉक तोडले. त्यानंतर आतमध्ये मुद्देमालाचा शोध घेत चांदीच्या वस्तू, पुजेतील साहित्य,रोकड असा सुमारे एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. एमआयडीसीतील महालक्ष्मी युनी एक्झीम प्रा.ली. येथे ही घटना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

काय घडले जळगावात
गिरीराज ओमप्रकाश जाजू (वय 57, विद्यानगर,आकाशवाणी चौक जवळ) यांच्या मालकीची ही दालमील आहे. 31 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी या दालमीलमध्ये प्रवेश केला. कंपनीचे आतील कार्यालयाच्या दरवाजाचे लॉक तोडत आत शिरले. 25 हजार रुपये किमतीचे 35 नाणे सुमारे एक किलो वजन.25 हजार रुपये किमतीचे पूजेसाठी वापरले जाणारे चांदीची घंटी, चांदीचा दिवा, चांदीची प्लेट, चांदीचा ट्रे, चांदीचा लोटा, चांदीचे अगरबत्ती स्टॅन्ड वजन एक किलो, रोख 60 हजार रुपये असा एकुण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले.



शनिवार, 1 रोजी सकाळी 8.15 वाजता दालमिल उघडली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ यांनी घटनास्थळी जावून पाहंणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याच्या कामी पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे तपास करीत आहेत.

दोन वाहन शोरुममध्ये तोडफोड
चोरट्यांची दिवसेंदिवस हिंमत वाढत आहेत. एमआयडीसी परिसरात चार चाकी शोरुम आणि दुचाकी शोरुमला लक्ष्य बनवित तोडफोड केली. ही घटना रविवारी रात्री घडली. चोरट्यांचा थयथयाट सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. जरब नसल्याने चोरट्यांना फावते आहे, अशी भावना या घटनेनंतर व्यावसायिकांनी व्यक्त केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !