कौटूंबिक वादातून भुसावळात जावयाला मारहाण : सासु, शालकासह तिघांविरोधात गुन्हा


भुसावळ (7 फेब्रुवारी 2025) : कौटुंबिक वादातून न्यायालयात दाखल केलेल्या केसनंतर तक्रारदार असलेल्या जावयाला न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये उभा असताना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सासु, शालकासह तिघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
विजय सुनील मोहिते (28, मालेगाव) या तरुणाच्या तक्रारीनुसार, शिवम गोपीचंद मोहिते (27), गुलाबसिंग चव्हाण (42, मानमोडी, ता.जामनेर), सिंधू गोपीचंद मोहिते (55, मानमोडी, ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांनी संशयीतांविरोधात खटला दाखल केल्याने केससाठी ते न्यायालयाच्या आवारात 5 रोजी दुपारी अडीच वाजता ते आई-वडिलांसह उभे असताना तक्रारदाराचा साला शिवमने तू इथून कसा जातो, मारूनच टाकतो म्हणत डोक्यावर काहीतरी मारल्याने रक्तस्त्राव झाला तर आई समजावत असताना सासू सिंधू मोहिते यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवाडे करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !