कॉपी बहाद्दर दोन विद्यार्थ्यांना धरणगावात केले डिबार
धरणगाव (12 फेब्रुवारी 2025) : धरणगाव केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्याांच्यावर कारवाई करण्यात आली. पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लागले आहे.
कॉपी करताना आढळताच कारवाई
जिल्ह्यात 11 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. 81 केंद्रातून 47 हजार 667 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर असताना योग्य ती खबरदारी घेऊनही धरणगाव येथे दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने धरणगाव येथील केंद्र क्रमांक 795 वर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.







