जळगावात मद्यपीच्या दुचाकीस्वाराच्या धडकेत व्यावसायीक जखमी


जळगाव (1 मार्च 2025) : मद्यप्राशन करुन सुसाट मोपेड अचानक रोडवर आणत दुचाकीला धडक दिल्याने व्यावसायीक जखमी झाला. ही घटना बुधवार, 26 रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास शहरात कानळदा ते शिवाजीनगर रोडवर घडली.

भरत भगवती प्रसाद ओझा ( वय 32,रा. विजयनगर कानळदा रोड) यांचे किराणा दुकान आहे. ते त्यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच. 19 बी.एफ.6884) ने दाणाबाजार परिसरात जात होते. अचानक मद्यप्राशन करुन संशयीत मोपेड सुसाट वेगात रस्त्यावर येत त्याने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन खाली पडले. मोपेडचालक तनवीर उर्फ तन्या रहिम शेख (व20, रा.गेंदालाल मिल) याने व्यावसयीयकाजवळ येत विचारपूस न करता चापटाबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. काही प्रत्यक्षदर्शीनी धाव घेत जखमी व्यावसायीकाला रस्त्याच्या कडेला नेले. त्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले. या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. हवालदार दीपक शिरसाठ तपास करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !