जळगावात कंपनी शेडचा पत्रा उचकवून 45 हजारांची रोकड लांबवली


जळगाव (3 मार्च 2025) : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकवून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करीत 45 हजारांची रोकड लांबवली. ही घटना 21
फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील एम सेक्टरमधील श्री गणपती इरिगेशन कंपनीत घडली. या प्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

काय घडले नेमके
मनोज हरी दलाल (39, रा.रामेश्वर कॉलनी) यांच्या मालकीची एम सेक्टरमध्ये 125 क्रमांकाची इरिगेशन कंपनी आहे. या ठिकाणी पत्र्याचा शेड आहे. हा पत्रा उचकटून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही फोडला. काउंटरमधील 45 हजारांची रोकड घेत चोरटा पसार झाला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कंपनीत जाऊन प्रकार जाणून घेतला. याप्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !