जळगावातील जीएस ग्राउंडवरुन दुचाकी लांबवली


जळगाव (5 मार्च 2025) : शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सुरुच आहेत. जी.एस. मैदानावर स्टेजच्या उजव्या बाजुला पार्किग केलेली सुमारे 30 हजार रुपये किमतीची होन्डा शाईन ( एमएच 19 ईएच 7369) दुचाकी चोरट्याने चोरुन नेली.

27 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकी मालक व्यावसायिक रणजीत अर्जुन चव्हाण (वय 30,रा. लिहे तांडा,ता.जामनेर) यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळुन आली नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सलीम तडवी हे तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !