मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती


Minister Manikrao Kokateमुंबई (5 मार्च 2025) : काही दिवसापूर्वी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला जिल्हा व सत्र न्यायालय यांनी स्थगिती दिल्याने कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत राखून ठेवलेल्या निकालाची सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीत कोकाटे बंधूंना मोठा दिलासा मिळाला.


आव्हान देणार्‍या दोन्ही याचिका फेटाळत ही सुनावणी आज 5 मार्च रोजी घेण्यात आली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कागदपत्र फेरफार अन् फसवणूक केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते. 1995 ते 97 मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे.

या निर्णयाला कोकाटे यांनी आव्हान देत शिक्षा स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत 1 मार्च रोजी यासंदर्भात निकाल देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचदरम्यान शनिवारी सकाळी अ‍ॅड.सतीश वाणी आणि आशुतोष राठोड यांनी पुन्हा शिक्षेच्या स्थगितीला आदेश देणार्‍या याचिका दाखल करीत त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा दाखला दिला. त्यानुसार शिक्षेची स्थगिती उठवून आ. कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवावी, ही मागणी त्यात करण्यात आली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी स्थगिती देण्याची याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना वरिष्ठ न्यायालयात हरकत दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली. तीन दिवसांत तुम्ही उच्च न्यायालयात जा अथवा 5 मार्च रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, आज यावर सुनावणी झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !