मोबाईल टॉवरच्या माध्यमातून जादा नफ्याचे आमिष : पाचोरा तालुक्यातील प्रौढाला 35 लाखांचा गंडा
Bait of extra profit through mobile tower : Adult from Pachora taluka duped of Rs. 35 lakhs जळगाव (8 मार्च 2025) : गुंतवणुकीतून कमी अवधीत भरपूर नफा कमविण्याचे अमिष दाखवून सायबर ठग लोकांना संभाषणातून जाळ्यात घेतात. त्यानंतर बँक खात्यातील लाखो रुपयांच्या रक्कमा खुबीने काढुन घेतल्याच्या घटना सतत वाढताहेत. एका महिलेसह तिचा साथीदार अशा दोन सायबर ठगांनी तक्रारदाराला शेतामध्ये जिओ टॉवर बसवून दर महिन्याला 20 हजार रुपये मोबदला देण्याची थाप देत भुरड घातली. त्यानंतर या प्रक्रियेसाठी वेगवेगळे कारणे सांगत पैसे खात्यात भरण्यास सांगितले. तब्बल 34 लाख 63 हजार 100 रुपयांचा गंडा घातला.
संपूर्ण खाते रिकामे केले. त्यानंतर फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात कैफियत मांडली.

53 वर्षीय गृहस्थ पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे शेती आहे. 6 जुलै 2024 ते 1 मार्च 2025 दरम्यान त्यांच्याशी अंकीता श्रीवास्तव तसेच तिचा साथीदार राघव कुमार अशांनी त्यांच्या व्हाट्सअप मोबाइलवर संपर्क साधला. अंकीता त्यांच्याशी बोलताना थापा देत म्हणाली, मी जिओ कंपनीतून प्रोजेक्ट मॅनेजर बोलत आहे. तुमच्यासाठी एक चांगली योजना आहे. त्यासाठी शेतात टॉवर बसवा,आणि दर महिना कमवा 20 हजार,असे सांगितले. सुरुवातीला तक्रारदाराने कानाडोळा केला. त्यानंतर ठगांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधत पैश्यांचे अमिष दाखविले. वारंवार मिठास बोलत ठगांनी आम्ही तुमचे आर्थिक हित पाहतोय,असा खोटा आव आणत तक्रारदारचा विश्वास संपादन केला. ग्रीमेंन्टसाठी आयजीएसटी भरावा लागेल.यासाठी लिंक टाचमेंटसाठी पैसे भरावे लागतील, डव्हान्स देण्यासाठी गर्व्हमेंट टॅक्स भरावा लागेल आणि या पैश्यांवर टॅक्स भरावा लागेल,अशा खुबीने ठगांनी थापा मारल्या.
पैसे उकळण्यासाठी ठगांनी वेगवेगळ्या दिलेल्या बँक खाते क्रमांक तक्रारदाला देत यात आम्ही जेव्हढे सांगु तेव्हढेच पैसे टाका, अशी बतावणी केली. त्यानंतर तक्रारदाराकडून तब्बल 34 लाख 63 हजार,100 रुपये ऑनलाईन स्विकारुन ठगांनी तक्रारदाराशी संवाद बंद केला. वारंवार तक्रारदाराने ठगांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रारदाराने कैफियत मांडली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.




