महिलेसह पती-मुलांना बेदम मारहाण


जळगाव (8 मार्च 2025) : गल्लीतील मुलांसोबत उभ्या असलेल्या कुटुंबातील मुलांना बोलविल्याच्या रागातून महिलेसह तिचा पती, दोन्ही मुले आणि नातू अशा सार्‍यांना लाकडी बांबूने आणि दगड फेकून मारत दुखापत केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.

मंगळवारी (4 मार्च) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार राजू राजपूत, बापू राजपूत, नीलेश राजपूत (सर्व रा. शिवाजीनगर, हुडको) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (5 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार शशिकांत पाटील हे तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !