जळगावात दुचाकी अपघातात दाम्पत्य जखमी : ट्रक चालकाविरोधात गुन्हा


जळगाव (9 मार्च 2025) : मागाहून वेगाने येणार्‍या ट्रकने कट मारल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले होते. ही घटना शुक्रवारी (6 मार्च) संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात महामार्गावर घडली होती. या प्रकरणी अरुण व्यंकट चौधरी (55, रा. सुदर्शन कॉलनी, निमखेडी रोड) यांच्या तक्रारीनुसार ट्रकचालकावर शुक्रवारी (7 मार्च) रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गंभीररीत्या जखमी महिलेवर खाजगी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत.

रागिणी चंपालाल पाटील (वय 45) तसेच त्यांचे पती चंपालाल आनंदराव पाटील (53, रा. साईनगर, भुसावळ) हे दाम्पत्य या ठिकाणी वास्तव्यास आहेत. रागिणी पाटील यांची जळगाव येथे खाजगी दवाखान्यात ट्रीटमेंट सुरू आहे. तपासणीसाठी गुरुवारी हे दाम्पत्य दुचाकी (एमएच 19 डीपी 2467) ने जळगावी येत होते.


कट लागताच कोसळली महिला
आकाशवाणी चौकातून दुचाकी नेत असताना मागून वेगाने येणारा ट्रक (सी.जी.04 एल.डब्ल्यू.1299) ने दुचाकीला कट मारला. त्यानंतर रागिणी पाटील या खाली कोसळल्या आणि गंभीररीत्या जखमी झाल्या.त्यांना एका रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. सहा डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार सुरू केला. प्राथमिक उपचाराअंती रागिणी पाटील यांना अधिकच्या उपचारार्थ खाजगी हास्पिटलमध्ये हलविण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (7 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शरद वंजारी हे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !