दहिगावातील तरुणाची विहिरीत आत्महत्या : टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी मित्रांना दिली कल्पना


यावल (16 मार्च 2025) : यावल तालुक्यातील दहिगावातील रहिवासी तरुणाने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमानंद उर्फ सोनु कमलाकर पाटील (23) असे मृत तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

मित्रांना दिली कल्पना
यावल पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दहिगावातील सोमानंद उर्फ सोनु कमलाकर पाटील हा तरुण दहिगाव बसस्थानकाच्या परिसरात चहा विक्री करून उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवार, 14 मार्च रोजी दुपारच्या सुमारास गाव शिवारातील किरण मधुकर नेवे यांच्या शेतातील विहिरीत त्याने उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. मी आत्महत्या करणार असल्याचे तरुणाने काही मिनिटा आधीच आपल्या मित्रांना सांगितले मात्र मित्रांनी त्याच्या बोलण्यावर दुर्लक्ष केले व काही वेळेतच तरुणाने मोठया प्रमाणावर जलसाठा असलेल्या विहिरीत आत्महत्या केली. या विहिरीत जलसाठा मोठ्या प्रमाणावर असल्याने मयताचे मृतदेह बाहेर काढताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. सोमानंद पाटील या तरुणाने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले ? हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.


कॉपी करू नका.