वाघोद्यात 60 किलो गोवंश मांस जप्त : एकाला अटक


वाघोदा (16 मार्च 2025) : वाघोदा बु.॥ येथे अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांच्या मासांची विक्री होत असल्याची माहिती सावदा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापेमारी करीत 12 हजार रुपये किंमतीचे 60 किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई आएशा मस्जीदच्या बाजुला असलेल्या एका पत्री शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी शेख नईम शेख अयुब कुरेशी (रसलपूर, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

पोलिसांनी वजन काटा, मांस कापण्यासाठीचा सुरा, रोख रुपये जप्त केले. ही कारवाई सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद पाटील, हवालदार किरण पाटील, कॉन्स्टेबल बबन तडवी, कॉन्स्टेबल मनोज तडवी, चालक कॉन्स्टेबल नामदेव कापडे, हवालदार संजीव चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विनोद पाटील करीत आहे.


मांस विक्रीची माहिती दिल्यास कारवाई करणार
सावदा परिसरात कुठेही गोवंश जातीच्या जनावराची मांस विक्री होत असेल त्याबाबत सावदा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यास निश्चितपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल व माहिती देणार्‍यांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !