प्रा.संजय मोरे यांचा राष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मान


रावेर (16 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील सिंगनूरचे रहिवासी व अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजपा अनु जाती मोर्चा राज्य सचिव प्रा.संजय मोरे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने हरियाणातील कर्नाल इंटर नॅशनल हॉटेल नुर महल येथे राष्ट्रीय आयकॉन ग्लोबल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. देशभरातील 30 मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला तर राज्यातून एकमेव प्रा.मोरे यांचा समावेश होता.

प्रा.संजय मोरे यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष रंज्योत सिंह होते. प्रमुख अतिथी अँटी करप्शन मानव अधिकार सुप्रीमो नरेंद्र अरोरा होते. सेलिब्रेटी चीफ गेस्ट फिल्म अभिनेता दिलीप ताहील, फिल्म अभिनेत्री सुधा चंदन, फिल्म अभिनेता आशिकी फ्रेम राहुल रॉय होते. प्रा.संजय मोरे व माया मोरे यांना शाल, बुके व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


राष्ट्रीय चेअरमन प्रवीण कुमार बन्सल, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निशा गुप्ता, राष्ट्रीय संचालक राम नारायण साहू, मुंबई दैनिक युवक आधार उपसंपादक किशोर गुडेकर, अँटी करप्शन महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत जाधव, डॉ.प्रतीक्षा जाधव, अँटी करप्शन जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !