भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी


जळगाव (18 मार्च 2025) : भरधाव वेगात चार चाकी वाहन आणत चालकाने दुचाकीला धडक दिली. रोडवर पडल्याने दुचाकीस्वारच्या डोक्याला गंभीर इजा होवुन जखमी झाला. ही घटना बुधवारी (12 मार्च) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल चोपडा रोडवर माचला फाट्यापुढे घडली. या अपघातात झगडसिंग ओंकार बारेला (37, रा.नारद, ता.चोपडा ) हे जखमी झाले.

जखमीला पाहिल्यानंतर चालक ताब्यातील वाहन घेवून पसार झाला. या प्रकरणी कार (एम.एच.04 एफ.एफ.9117) वरील चालकावर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार मधुकर पवार हे तपास करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !