म्हसावद शेत शिवारात दादरच्या कडब्याला आग : 15 हजाराचे नुकसान


जळगाव (18 मार्च 2025) : शेतात दादरच्या कडब्याच्या पेंढ्यांचा गुड होता. अचानक आग लागल्याने 350 कडब्याच्या पेंढ्या जळुन खाक झाल्या. यात 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी (15 मार्च) सकाळी सहा वाजेपूर्वी ही घटना म्हसावद शेतशिवारात घडली.

दशरथ गंगाराम कोळी (45, रा.म्हसावद, खर्चीनगर) यांच्या मालकीचे शेत आहे. दादरची काढणी केल्यानंतर त्यांनी चार्‍याच्या पेंढ्या बांधल्या. त्यानंतर या पेंढ्यांचा गुड शेतामध्ये रचला होता. अचानक या गुडला आग लागुन संपूर्ण कडब्याचा चारा खाक झाला. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. हवालदार स्वप्नील पाटील हे तपास करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !