नागपूर सहलीवरून परतणार्‍या जळगावातील महिला अभियंत्याचा भीषण अपघातात मृत्यू


जळगाव (18 मार्च 2025) : नागपूर सहलीवरून जळगावी पतीसोबत येणार्‍या महिला अभियंत्यांचा चारचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मुर्तिजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडला. झाडांना पाणी देणारे टँकरवर कारवर आदळल्याने जळगावातील महिला अभियंता ठार झाया तर ट्रॅक्टर चालकाचाही मृत्यू झाला.

काय घडले नेमके ?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील दाम्पत्य नागपूर येथे सहलीसाठी गेले होते व परतत असतांना मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातादरम्यान झाडांना पाणी देणारा टँकर उभा असताना भरधाव वेगात येणारी कार टँकरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, जळगाव येथील महिला अभियंता कल्पना पराग लिमये (56) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती पराग नागेश लिमये (57) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅक्टर चालक सुनील ठाकरे (वय-48) याचाही जागीच मृत्यू झाला.


जळगावातील रिंगरोडवर गणगोपी अपार्टमेंटजवळ इलेक्ट्रीक अभियंता पराग लिमये हे त्नी अल्पनपा, पुण्यातील मुलगा अभिषैक, त्याची पत्नी, सासु-सासर्‍यांसह चार दिवसांपूर्वी नागपुरात गेले होते. रविवार, 16 मार्च रोजी दुपारी दाम्पत्य जळगावकडे परतत असताना दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील कुरूमनजवळील रस्त्यावर झाडांना पाणी देण्यासाठी उभे असलेल्या ट्रॅक्टरच्या टँकरला कार क्रमांक (एमएच 19 बीजे 3981) ने जोरदार धडक दिली. या अपघातात कल्पना लिमये यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पराग लिमये यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

गंभीर दुखापत असल्याने पराग यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !