जळगावातील शिवराम लॉजला भीषण आग : सात लाखांचे नुकसान


जळगाव (18 मार्च 2025) :  शहरातील टॉवर चौकाजवळील विलास लॉज शेजारी असणार्‍या शिवराम लॉजच्या इमारतीला मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता अचानक आग लागली. अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. सुमारे तासभर चाललेल्या या आगीमध्ये विविध साहित्य जळून खाक झाले तर सात लाखांचे नुकसान झाले.

सात लाखांच्या नुकसानीचा अंदाज
आगीमध्ये पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. नवी पटेल नावाच्या व्यक्तीने अग्निशामक दलाच्या विभाग कार्यालयात खबर दिल्यावरवरून नवजीवन दुकानच्या बाजूला शिवराम लॉजिंग टॉवर चौक येथे आग लागली असल्याची माहिती दिली. घटनास्थळी महापालिकेच्या तीन अग्निशामक बबांनी तिसर्‍या मजल्यावर शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत फर्निचर, एसी, पंखे, गादी चादर, इत्यादी साहित्य जळून खाक झाले आहे. लॉज मालकाचे सुमारे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे. दरम्यान, आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


आग विझवणारे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, अश्वजीत घरडे ,वाहन चालक देविदास सुरवाडे, संतोष तायडे, संजय भोईटे, फायरमन रोहिदास चौधरी, विजय पाटील, भगवान पाटील, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, तेजस जोशी, गिरीश खडके यांनी आग तत्परतेने आटोक्यात आणली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !