जळगाव जिल्हा परिषदेच्या नूतन सीईओपदी मीनल करनवाल : अंकित यांची छत्रपती संभाजीनगरला बदली


Minal Karanwal as the new CEO of Jalgaon Zilla Parishad जळगाव (18 मार्च 2025) : जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगावात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल बदलून येत आहेत.

महाराष्ट्रातील नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून त्या कार्यरत होत्या. 2019 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मीनल करनवाल यांनी नांदेड सीईओ म्हणून विविध उपक्रम राबविले. त्यात भेटीला आलेल्यांकडून पुष्पगुच्छ वैगरे न घेता शालेय साहित्य स्विकारून ते जिल्हा परिषदेमध्ये शिकणार्‍या गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचा एक हृदयस्पर्शी उपक्रम त्यांनी चालवला होता.नांदेड जिल्ह्यात त्यांनी राबविलेला बालिका पंचायत हा उपक्रम सुद्धा चर्चेत राहिला.


राज्य शासनाकडून नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या

आंचल गोयल : मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अंकित : छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करनवाल : जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कवली मेघना : जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

करिश्मा नायर : नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रणजित मोहन यादव : प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !