नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या


Police Sub-Inspector Someshwar Bhanudas Gore नाशिक (18 मार्च 2025) : नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील वसतीगृहाच्या राहत्या खोलीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सोमेश्वर भानुदास गोरे (32, खोली क्र-155, दक्षिण वसतीगृह, एमपीए) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. गोरे हे बीड जिल्ह्यातील धोंडराई गावातील मूळ रहिवासी असून या घटनेने महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या वर्तुळात खळबळ उडाली.

गोरे यांनी सोमवारी दुपारी ते प्रशिक्षण घेत असलेल्या 15 क्रमांकांच्या स्कॉडसह 13, 14 क्रमांकांच्या स्कॉडमधील प्रशिक्षणर्थींची उंटवाडी येथील बाल सुधारगृह भेटीचे आयोजन केले.


पाऊण वाजेच्या सुमारास ही भेट आटोपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलीस नाईक चंद्रकांत पांडुरंग घेर (32, रा.नेम.कवायत निर्देशक, एमपीए) यांनी वसतीगृहात सोडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्कॉड फॉलिंग घेण्यात आले.

भरत नागरे यांनी घेर यांना कळविले की, प्रशिक्षणार्थी गोरे हे फॉलिंगला हजर राहिलेले नाहीत. त्यानंतर त्यांनी स्कॉड मार्च करून गोरे राहत असलेल्या दक्षिण वसतीगृह खोली क्र-155 गाठली. तेथे खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता ते गळफास घेतलेला असल्याचे आढळून आले, अशी खबर घेर यांनी गंगापूर पोलिसांना कळवली.

गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार किशोर पगार हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील दोन भावंडे असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !