छत्रपती संभाजी नगरातील औरंगजेबाची कबर हटवावी
भुसावळातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची मागणी : प्रशासनाला निवेदन
भुसावळ (19 मार्च 2025) : छत्रपती संभाजी नगरातील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा जोरदारपणे उचलली आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जिल्हा प्रखंड आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत औरंगजेबाच्या कबरला नष्ट करण्याची मागणी केली आहे. ही कबर छत्रपती संभाजी नगरात मध्यभागी असून हिंदू समाजासाठी ती एक अशोभनीय ठिकाण मानली जात आहे. हिंदू संघटनांनी पत्रात आणि घोषणामध्ये औरंगजेबाच्या कृत्यांची आठवण करून दिली आहे, ज्याने अनेक हिंदूंचे धर्मपरिवर्तन केले आणि इतिहासात असंख्य अत्याचार केल्याचे त्यात नमूद आहे.
तर संभाजी नगरात कार सेवा
भारताच्या स्वतंत्रतेला ठेच देणारी अशी कबर नष्ट करणे आवश्यक आहे. याशिवाय, त्यांनी चेतावणी दिली आहे की, जर कबर हटविली गेली नाही, तर ते छत्रपती संभाजी नगरात कारसेवेची तयारी करणार आहेत आणि कबर उद्ध्वस्त करणार आहेत. या प्रकरणावर त्वरित निर्णय घेण्याची आणि योग्य कारवाई करण्याची अपेक्षा हिंदू समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या वतीने नायब तहसीलदार प्रीती लुटे यांना निवेदन स्वीकारले. यावेळी दिलीप ओक यांनी प्रस्तावना मांडली.

