मुक्ताईनगरातील छेडखानी प्रकरण : सरकारतर्फे अ‍ॅड.केतन ढाके यांची नियुक्ती


भुसावळ (19 मार्च 2025) : मुक्ताईनगरात भाजपा महिला पदाधिकार्‍याच्या कन्येची टारगटांनी यात्रोत्सवात छेडखानी केली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात पोक्सो अन्वये गुन्हादेखील दाखल आहे. या खटल्यासाठी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून वकील संघाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.केतन ढाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या कायदे व न्याय विभागातर्फे मंगळवारी याबाबत आदेश काढण्यात आले. त्यात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 63/20025 याच्या खटल्यासाठी अ‍ॅड.केतन ढाके यांची नियुक्त करण्यात येत असल्याचे विभागीय अधिकारी वैशाली बोरुडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !