जळगावातील कंजरवाडा भागात डीपीला आग
Fire at DP in Kanjarwada area of Jalgaon जळगाव (20 मार्च 2025) : जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात महावितरण कंपनीच्या डीपीला अचानक आग लागली. मनपा अग्निशमन विभागाचा बंब आणून कर्मचार्यांनी आग विझविली.
डीपीवर आगीचे लोळ दिसल्यानंतर शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांनी
महावितरणचे तिवारी यांना तत्काळ ही माहिती दिली. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सागर सदावर्ते, तंत्रज्ञ प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे अधीक्षक शशिकांत बारी यांनी तत्काळ बंब पाठविला. अग्निशमन पथकातील कर्मचार्यांनी पाण्याचा फवारा मारून डीपीला लागलेली आग विझविली. योगेश बागडे, उमेश माछरेकर, नितीन तमायचे, गौरव नाथ, सुभाष गारुंगे यांनी याकामी मदत केली.





