जळगावात दुचाकीची दुभाजकाला धडक, दोन तरुण जखमी


Two youths injured after bike hits divider in Jalgaon जळगाव (20 मार्च 2025) :  शहरात येत असताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले. मंगळवारी (18 मार्च) दुपारी शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर ही घटना घडली. बापू रमेश सपकाळे (वय 47), राजेश प्रकाश वाघ (वय 23, दोन्ही रा.आव्हाणा) अशी जखमींची नावे आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ हलविले. ही घटना कळाल्यानंतर आव्हाणा येथील नातेवाइकांसह स्नेहीजनांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !