नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा निर्घृण खून
Brutal murder of two close siblings in Nashik नाशिक (20 मार्च 2025) : नाशिकमध्ये गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून दोघा भावंडांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेकरवाडीत हा प्रकार घडला. उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव, अशी खून झालेल्या भावांची नावे आहेत. उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्याचे समजते. दरम्यान, काही संशयीतांना ताब्यात घेतल्याचे समजते.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधुवर जोरदार हल्ला चढविला. एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले. ही बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आली. यानंतर, दोघांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर आदींनी धाव घेतले. हल्लेखोर फरार झाले असून चार पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केल्याचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी म्हटले आहे.