भुसावळात कायदेविषयक परीक्षेत पोलीस कर्मचारी हर्षल महाजन प्रथम
भुसावळ (22 मार्च 2025) : भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची 2024-25 या कालावधीतील वार्षिक तपासणी पूर्ण झाली. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांना नवीन कायदे अंमलबजावणबाबत तरतुदी, परिपत्रके आणि न्यायालयीन निर्णयांची अद्ययावत माहिती होण्यासाठी पोलीस कर्मचार्यांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यता हर्षल महाजन या कर्मचार्याने प्रथम क्रमांक पटकावला.
24 अंमलदारांना 60 पेक्षा अधिक गुण
भुसावळ उपविभागात 2023 पासून दरवर्षी 100 गुणांची कायदेविषयक परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील 49 पोलीस अंमलदार, तालुक्याचे तीन, शहर पोलीस स्टेशनचे दोन, नशिराबाद पोलीस स्टेशनचा एक अंमलदार, वाहतूक शाखेचे तीन अंमलदार आणि उपविभागीय कार्यालयातील दोन अंमलदार अशा एकूण 60 अंमलदारांनी सहभाग घेतला होता. यात 24 पोलीस अंमलदारांनी 60 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणार्या हर्षल सुरेश महाजन यांना एक हजार, द्वितीय क्रमांक मिळवणार्या सागर विश्वनाथ वंजारी यांना 700 आणि तृतीय क्रमांक मिळवणार्या अतुल शंकरराव पवार यांना 500 रुपये रोख बक्षिसाची शिफारस करण्यात आली आहे. हे बक्षीस पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याहस्ते वितरित करण्यात येणार आहे.

पोलीस कर्मचार्यांची परीक्षा पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सर्व पेपरची तपासणी केली.
