झोपडपट्टी सुधार क्षेत्रात अल्पसंख्यांक रहिवाशांना मुलभुत सुविधा पुरवा

भुसावळ शहरातील रहिवाशांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ (23 मार्च 2025) : शहरातील झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील अल्पसंख्यांक विभागातील रहिवाशांनी मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. गेल्या चार वर्षांपासून वारंवार अर्ज देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप रहिवाशांनी निवेदनाव्दारे केला आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा पुढील आंदोलनात्मक मार्ग स्विकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

अशा आहेत मागण्या
झोपडपट्टी सुधार क्षेत्र अंतर्गत सर्वे नंबर 15, 16,20, 203, 20ब, 21, 43 ते 46, 47 ते 49, 51,52, 56, 85, 101, 102, 104, 106, 137, 151-अ येथे पाणी, वीज, रस्ते व इतर मूलभूत सेवा उपलब्ध नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासन नियमितपणे घरपट्टी व नळपट्टी वसूल करत असतानाही सुविधा उपलब्ध करून देण्यात अयशस्वी ठरले आहे. शाळांची दुरवस्था: नगरपालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, फवारणी व स्वच्छता मोहिम राबवावी, पिण्याच्या पाण्याचा शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, खुल्या जागांमध्ये गार्डन, खेळणी व व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे, बंद स्ट्रीट लाईट कार्यान्वित कराव्यात व नवीन शौचालये, मुतारी बांधावीत आदींसह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे.


यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
या निवेदनावर इलियास इक्बाल मेमन, हबीब चव्हाण, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, आरीफअब्दुल गणी, अ‍ॅड.एहतेश्याम मलिक, मनोज चंदन, राजू वाणी, वसीम सलीम पटेल, नजर शेख, शेख यामीन, वसीम पटेल, डॉ. मोहम्मद युनूस फलाई, डॉ. शकील अहमद, फिरोज अहमद, हरून शेख, सिकंदर खान यांच्यासह 51 रहिवाशांच्या सह्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !