दोन लाख दहा हजारांची लाच घेताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सुरगाणा पंचायत समितीत खळबळ : थकीत बिल काढण्याच्या मोबदल्यात स्वीकारली लाच


Uproar in Surgana Panchayat Samiti  नाशिक (26 मार्च 2025) : थकीत बिल काढण्याच्या मोबदल्यात दोन लाख 10 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सुरगाणा, जि.नाशिक येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍याला नाशिक एसीबीने अटक केली. वर्ग एकच्या अधिकार्‍याला एसीबीने पकडल्यानंतर पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. महेश गोकुळ पोतदार असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
44 वर्षीय तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजने मध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार आहेत. बीडीओ महेश गोकुळ पोतदार यांनी तक्रारदाराचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये यांचे थकीत सुमारे दोन कोटी 32 लाख 30 हजार 27 रुपयेचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख 10 हजारांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिली व लाच पडताळणी करण्यात आल्याने पोतदार यांनी दोन लाख 10 हजार रुपये लाच मागून स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच अधिकार्‍याला बेड्या पडल्या.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शरनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, नाईक किरण धुळे, पोलीस नाईक विलास निकम, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !