भुसावळात लेवा समाज वधू-वर सूची 2026-27 चे वितरण सुरू
भुसावळ (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : लेवा नवयुवक संघ, जळगाव यांच्या वतीने सकल लेवा पाटीदार समाजातील विवाहोच्छुक वधूंची शैक्षणिक, कौटुंबिक व व्यावसायिक माहिती असलेली विवाह इच्छुक वधू सूची 2026-27 चे वितरण सुरू करण्यात आले आहे.
या सूचीमध्ये एकूण एक हजार 44 वधूंची छायाचित्रांसह माहिती समाविष्ट करण्यात आली असून घटस्फोटित 91 विवाह इच्छुक वधूंची शैक्षणिक पात्रता व वयानुसार स्वतंत्र सूचीही परिश्रमपूर्वक तयार करण्यात आली आहे.








ही सूची समाजबांधवांना शांताराम पाटील (मो. 9545207050), वांजोळा रोड, लक्ष्मीनगर तसेच आपले परिवार सार्वजनिक वाचनालय येथे उपलब्ध होणार आहे. वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद नारायण सरोदे यांनी ही माहिती दिली.
येत्या 29 नोव्हेंबरपूर्वी ही सूची पालकांपर्यंत पोहोचणार असल्याने विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधण्यास मदत होणार आहे. पालकांना आपल्या अपेक्षा व निकषांनुसार अनुरूप स्थळ निवडणे सुलभ होईल. समाजातील विवाहोच्छुक कुटुंबांनी या सूचीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.