पाचोर्‍यात धूम स्टाईल भामट्यांनी मंगळसूत्र लांबवले


In Pachoriya, the Dhoom style bhamtya lengthened the mangalsutra न्युज डेस्क । पाचोरा (25 मे 2025) : पाचोरा शहरात लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह दोन सोन्याच्या पोत अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने ओरबाडून नेल्याची घटना भडगाव रोडवर घडली आहे.

मीना अजितसिंग पाटील (53, पुणे) या महिला 22 मे रोजी नातेवाईकांकडे लग्नाला आल्या असता लग्नघरी पायी जात असताना, भडगाव रोड महामार्गावर एका हॉटेलसमोर भडगावकडून येत असलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 28 ग्रॅमचे मंगळसूत्र व 49 ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण एक लाख 82 हजारांचा ऐवज लांबवला.

यावेळी महिलेने दुचाकीवर बसलेल्या मागच्या इसमाच्या शर्टाची कॉलर पकडली मात्र दुचाकी भरधाव नेत चोरांनी पळ काढला. यावेळी महिला खाली पडल्याने जखमी झाली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !