खिर्डीत शेतकर्‍याच्या गोदामाला आग : लाखोंचे साहित्य खाक


खिर्डी, ता.रावेर (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026)  : रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द परिसरातील पायागिरी वाडा येथील शेतकरी राजकुमार डिगंबर महाजन यांच्या गावातील गोदामाला सोमवार, 9 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत गोदामात ठेवलेले पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाच्या नळ्या, मौल्यवान सागवानी लाकूड आणि बांबू असा सर्व माल जळून खाक झाला. आगीत 15 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

काही क्षणात पसरली आग
सोमवारी पहाटेच्या वेळी अचानक उठलेल्या आगीच्या ज्वाला पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला मात्र आगीचे रौद्ररूप आणि सुक्या लाकडांसह प्लास्टिकच्या साहित्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. यामुळे गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेमुळे शेतकरी राजकुमार महाजन यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पीडित शेतकर्‍याला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !