अमळनेरात 16 वर्षीय अल्पवयीनावर अत्याचार


16-year-old minor raped in Amalner अमळनेर (26 मे 2025) : गुजरातच्या सुरतमधील रहिवासी असलेली अल्पवयीन तरुणी पाच वर्षांपूर्वी पारोळा येथे नातेवाईकांकडे शिक्षणासाठी आल्यानंतर अमळनेरात शिक्षण घेत असताना तिची एका तरुणाशी ओळख झाली व संशयीताने धमकी देत पाच वर्षांपासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रविवारी संशयीताविरोधात अमळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असलेली 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही पारोळा तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे गेल्या पाच वर्षांपूर्वी वास्तव्याला होती. त्यावेळी ती अमळनेर येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. शाळेचे स्नेहसंमेलनमध्ये संशयीत आरोपी जितेंद्र अनिल सदानशिव याच्याशी ओळख निर्माण झाल्यानंतर पीडीता अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन 2020 पासून अत्याचार करण्यात आला मात्र पीडीतेने त्यास नकार दिल्यानंतर संशयीताने आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यानंतर तिच्यासोबत पुणे येथे जाऊन बळजबरी विवाह कार्यालयात लग्न लावून शारीरिक व मानसिक त्रास दिला.

पीडित मुलीने अखेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जितेंद्र अनिल सदानशीव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !