शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात

सेन्सेक्स 121 अंकांनी वधारला


न्युज डेस्क । नवी दिल्ली (4 जून 2025) : बुधवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली असून सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये खुले झाल्याने गुंतवणूकदार सुखावले आहेत.

तब्बल तीन दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 175.31 अंकांनी वधारून 80,912.82 अंकांवर व्यवहार करत आहे तर निफ्टी 47.20 अंकांच्या वाढीसह 24,589.70 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समध्ये एअरटेल, इटर्नल, टेक महिंद्रा, मारुती, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्हमध्ये तेजी दिसून आली. त्याचबरोबर टायटन, टीसीएस, सन फार्मा आदी शेअर्समध्ये घसरण झाली.





मंगळवारी शेअर बाजारात सलग तिसर्‍या दिवशी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स 636.24 अंकांनी घसरून 80,737.51 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 174.10 अंकांच्या घसरणीसह 24,542.50 अंकांवर बंद झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भांडवलाचा ओघ आणि जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चौफेर विक्रीमुळे बाजारात घसरण झाली होती.

अमेरिकन बाजारांनी सुरुवात मंदावल्यानंतर जबरदस्त सुधारणा दाखवली आणि चौथ्या दिवशीही ते तेजीसह बंद झाले. डाऊ जोन्सनं दुहेरी शतक म्हणजेच 200 पेक्षा जास्त अंकांची वाढ नोंदवली, तर नॅस्डॅक सुमारे 150 अंकांच्या वाढीसह बंद झाला. आज सकाळी आशियाई बाजारांवरही त्याचा परिणाम दिसून आला. गिफ्ट निफ्टी सुमारे 50 अंकांनी वाढून 24,700 च्या वर व्यवहार करत आहे, तर जपानचा निक्केई निर्देशांक 300 अंकांच्या वाढीसह मजबूत दिसत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !