साकेगावातील माजी विद्यार्थ्यांकडून एक हात मदतीचा उपक्रम

मयत मित्राच्या कुटूंबाला मदत करीत निर्माण केला आदर्श


A helping hand initiative from former students of Sakegaon साकेगाव (4 जून 2025) : साकेगावातील इंदिरा माध्यमिक विद्यालयात 1998-99 मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला. यावेळी सोबत शिकणार्‍या विद्यार्थ्याचे निधन झाल्याची वार्ता कळताच सोबतच्या मित्रांनी निधी जमवत कुटूंबाला 1 जून रोजी झोडगे, ता.मालेगाव येथे जाऊन दिली.

विद्यार्थ्यांनी जोपासली माणुसकी
स्व.सुधाकर फुलशिंग सोनवणे हा विद्यार्थी साकेगाव येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात शिक्षणास होता. वडिलांच्या बदलीमुळे त्याला साकेगाव सोडावं लागले व त्याच्या गावी झोडगे येथे वास्तव्यास गेला. कालांतराने म्हणजेच 28 वर्षानंतर त्याने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात गेट-टुगेदर व्हावे यासाठीची 15 जानेवारी 2025 ही तारीखही निश्चित केली होती मात्र काळाला काही वेगळंच मान्य होतं. सुधाकर सोनवणे याचा 17 नोव्हेंबर 2024 ला आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी साकेगावातील 1998 – 99 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी त्याच तारखेला गेट-टुगेदर घेऊन स्वर्गीय सुधाकर सोनवणे याच्या परिवारास आर्थिक मदत जमा केली. हजार रुपये जमा केलेत. या मदतीत शिक्षकांनी सुद्धा हातभार लावलेला आहे.


स्व.सुधाकरच्या मागे मोठा परिवार
स्व. सुधाकरच्या मागे आई, पत्नी वैशाली, मोठी मुलगी ईश्वरी (इयत्ता 8 वी), दुसरी मुलगी धैर्या (इयत्ता 4 थी), लहान मुलगा हसराज (इयत्ता 2 री) व विवाहीत भाऊ असा मोठा परिवार आहे. सुधाकरचे वडील याआधीच वारले आहेत. परिवाराची जबाबदारी ही सुधाकरवरच होती. तो अचानक जाण्याने फार मोठी हानी झाली आहे.

रक्कम मुलाच्या नावाने एफडी
रोख रक्कम देण्याऐवजी आम्ही परिणामी साकेगावच्या विद्यार्थी ग्रुपने सुधाकरचा सर्वात लहान मुलगा हसराज याच्या नावाने 41 हजार रुपयांची एफडी करण्याचा निर्णय घेतला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !