जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा उद्योजक मनोज बियाणींनी केला सत्कार
Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil was felicitated by entrepreneur Manoj Biyani पाळधी (5 जून 2025) : जळगावचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा गुरुवार, 5 जून रोजी वाढदिवस असल्याने भुसावळातील प्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी यांनी पाळधी येथून जावून मंत्री पाटील यांचा सत्कार करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्ह्यात मोठा चाहता वर्ग आहे. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मिडीयाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. भुसावळातील उद्योजक मनोज बियाणी यांनीदेखील गुरुवारी पाळधी येथे जावून मंत्री गुलाबरावांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी अनेक आठवणींना उजाळाही देण्यात आला. प्रसंगी भुसावळातील राजीव पारीख उपस्थित होते.