बॅड मिंटन खेळत असताना माजी पोलिस अधिकार्याचा मृत्यू

Former police officer dies while playing badminton भंडारा (6 जून 2025) : शहरात बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याचाहृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाला. भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर ही घटना घडली. बाजीराव चिंधालोरे (60) असं मृत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचं नावं आहे.
विशेष म्हणजे बाजीराव चिंधालोरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्याला व्यस्त करण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर यायचे, बॅडमिंटन खेळ खेळायचे. मात्र, आज अचानक खेळता-खेळता ते खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. भंडारा शहरातील शिवाजी महाराज स्टेडियमवर ही दुर्घटना घडली. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं.