हद्दपारी, एमपीडीए प्रस्ताव वाढवा ; पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचना


भुसावळ (6 जून 2025) : आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त हद्दपारी आणि एमपीडीए प्रस्ताव तयार करा तसेच विविध गुन्ह्यातील पसार असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या मुसक्या आवळाव्यात, शहरात दादागिरी करणार्‍यांवर वचक ठेवत प्रतिबंधात्मक कारवायांवर भर द्या, अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या. पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीवेळी आयोजित अधिकार्‍यांच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

दोन ठाण्यांची वार्षिक तपासणी
शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी गुरुवारी डॉ.रेड्डी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यांतील विविध विभागांतील फाईल्स, रजिस्टर, नष्ट केलेला व जप्त मुद्देमाल, पसार संशयीत कोण आहे, ते कधीपासून पसार आहे, प्रलंबित गुन्हे आणि उघड गुन्ह्यांची माहिती घेतली.




ठाण्यातील कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तपासणी दरम्यान डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहरचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, निरीक्षक महेश गायकवाड, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले उपस्थित होते. दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये हद्दपार व एमपीडीए प्रकरणांची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर, अशा प्रस्तावांची संख्या वाढविण्याचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश एसपी रेड्डी यांनी दिले. ईदच्या पार्श्वभुमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी केल्यात.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !