खेळांतूनही नोकरीच्या संधी मिळवता येतात : डीवायएसपी कृष्णांत पिंगळे


भुसावळ (10 जून 2025) :  विविध खेळांतून राज्य, राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळविल्यास सरकारी नोकरीमध्ये संधी मिळू शकते त्यामुळे पालकांनी मुलांना खेळापासून दूर नेऊ नये, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी केले. जय गणेश फाऊंडेशनच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष तथा राज्यस्तरीय कबड्डीपटू स्व.चैत्राम अप्पा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी चेसबोर्डवर चाल खेळून केले. त्यावेळी डीवायएसपी पिंगळे बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी त्यांनी खेळाच्या माध्यमातून डीवायएसपी, उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर नोकरी मिळत असल्याचे सांगून विविध उदाहरणे दिली. अध्यक्षस्थानी भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे होते, व्यासपीठावर समन्वयक गणेश फेगडे, क्रीडाशिक्षक रमण भोळे आणि इंदुमती पवार होत्या.



103 स्पर्धकांचा सहभाग
बुद्धिबळ स्पर्धेत सुमारे 103 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात शिवम वारुळकर विजेता तर पालवी माळी उपविजेता, इयत्ता आठवी ते दहावी गटात सोहम चौधरी विजेता तर अंगद मंगलानी उपविजेता आणि खुल्या गटात अनिकेत शिरोळे विजेता तर, अपूर्व फडके हा उपविजेता ठरला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुकाराम आटाळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष डी.एस.पाटील, प्रा.ए.व्ही.चौधरी, नचिकेत यावलकर, राहुल भावसेकर, तुषार झांबरे, पार्थ चौधरी, सुमित यावलकर, प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले. पंच म्हणून पुष्कर चौधरी यांनी काम पाहिले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !