सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा : तत्काळ तिकीट काढणे आता अधिक सुलभ
भुसावळ (11 जून 2025) : सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट योजनेचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत:
01 जुलै 2025 पासून तत्काळ सुविधा अंतर्गत तिकिटांची बुकिंग फक्त भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपमार्फत आधार प्रमाणीकरण केलेल्या वापरकर्त्यांद्वारेच शक्य असणार आहे.


15 जुलै 2025 पासून तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण बंधनकारक असेल.
तत्काळ तिकीटांची बुकिंग रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काउंटरवर किंवा अधिकृत एजंटांमार्फत सिस्टमद्वारे पाठवलेल्या ओटीपीच्या प्रमाणीकरणानंतरच होऊ शकते. हा ओटीपी प्रवाशाने बुकिंग करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल. ही सुविधा देखील 15 जुलै 2025 पासून लागू केली जाईल.
रेल्वेचे अधिकृत तिकीट एजंट तात्काळ बुकिंगच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या 30 मिनिटांपर्यंत तिकीट बुक करू शकणार नाहीत.
वातानुकूलित (-उ) वर्गासाठी तात्काळ तिकीट बुकिंगची परवानगी सकाळी 10:00 ते 10:30 या वेळेत अधिकृत एजंटांना दिली जाणार नाही.
स्लीपर वर्गासाठी तत्काळ तिकीट बुकिंगची परवानगी सकाळी 11.00 ते 11.30 या वेळेत अधिकृत एजंटांना दिली जाणार नाही.
या सुधारित तरतुदीचा उद्देश तात्काळ बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि सामान्य प्रवाशांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा आहे.





