कोरोना : देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन : पंतप्रधानांची घोषणा
मुंबई : देशात लागू असलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी देशवासीयांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. 20 एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाच्या संख्येत घट झाल्यास त्या ठिकाणी हळूहळू आवश्यक बाबींना सूट देण्यात येईल असेही मोदींनी जाहीर केले. आर्थिकदृष्ट्या लॉकडाऊन महाग आहे परंतु जनतेसाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे.
कोणत्याही कर्मचार्याला कामावरून काढू नये
देशात कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने देशवासीयांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी देशवासीयांना सात विशेष बाबी सांगितल्या. त्यात घराबाहेर न निघणे, घरातील वृद्धांची विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले तसेच कोणत्याही खासगी संस्था तसेच कंपन्यांनी कर्मचार्यांना कामावरून काढू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.


रेल्वे सेवाही ठप्प राहणार
देशातील सर्व मेल, एक्स्प्रेस, मेट्रो, लोकल या 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचे येणार असल्याचे पत्रक रेल्वे बोर्डाने काढले आहे. या काळात ज्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्यातील तिकिटांचा पूर्ण रीफंड प्रवाशांना मिळणार आहे तसेच पुढील सेवा कधीपासून सुरू होईल याबाबत आताच सांगणे शक्य नसल्याचेही रेल्वेने कळविले आहे.